करिनाने अमिशाच नाव घेताच तोंड केलं वाकड, अन् दिलं हे उत्तर … आलियाने करणच्या शोला म्हटले कॉन्ट्रोवर्शियल
Koffee with Karan 8: कॉफी विथ करण हा करण जोहर चॅट शो सध्या दीपिका आणि रणवीरच्या एपिसोड नंतर फार चर्चेत आला. कॉफी विथ करण या शोचा सध्या आठवा सीजन चालू आहे. ह्या सीजन चे सुरु होऊन यापूर्वी तीन भर प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहेत आता या चॅट शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही जोडी म्हणजे आलिया भट्टआणि करीना कपूर खान.
या एपिसोडचा प्रोमो सध्या करण च्या इंस्टाग्राम पोस्ट द्वारे सोशल मिडियावर शेयर करण्यात आला आहे. या प्रोमोत आलियाने करणच्या शोला वादग्रस्त शो म्हटलं आहे.तर दुसरीकडे करण जोहर करीनाला अभिनेत्री अमिषा पटेलसोबतच्या तिच्या मागील भांडणाबद्दल बोलताना दिसत आहे. करण विचारतो की, ‘अमिषा पटेलसोबत तुझे काही भांडण झाले आहे का?’.असा प्रश्न केलाय
यावर बेबो म्हणते, ‘मला याविषयी आणि कोणत्या भांडणाबद्दल काही बोलायचे नाही?’. करण सांगतो की, आधी तू ‘कहो ना प्यार है’ या रोमँटिक चित्रपटात काम करणार होतीस, पण नंतर अमिषा पटेलला त्या चित्रपटात भूमिका मिळाली. हे ऐकताच करिना करणकडे दुर्लक्ष करते. असं ह्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं आहे.
आलिया भट्ट आणि करीना कपूरचा हा नवा एपिसोड डिस्ने+हॉटस्टारवर (Disney + Hotstar) 16 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.