लोकसभेच्या निवडणुका 16 एप्रिलला? व्हायरल पत्रावर निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं..
नवी दिल्ली : (Lok Sabha Election 2024) मागील काही दिवसांपासून देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहात आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं (Election Commission Of India) एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान स्पस्टीकरण देत असताना निवडणूक आयोगाने सांगितलं की, निवडणुकीच्या कामासाठी (Lok Sabha Election) फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केली आहे . त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्राच्या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे.
निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 16 एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचं सांगण्यात येतंय. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. त्या माध्यमातून 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?
निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 घोषित केला आहे. अधिसूचना दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती. त्यावर ‘भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालनपालन’ असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने थोड्याच वेळात ट्विटरवर पोस्ट केले आणि ती तारीख केवळ संदर्भासाठी होती.