क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

एमएस धोनीवर मॅच फिक्सिंगचे आरोप, अन् IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा

MS Dhoni Match Fixing Case : मद्रास उच्च न्यायालयाने भारताची माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मॅच फिक्सिंग केल्याचा दावा करणाऱ्या आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी धोनीने न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती. संपत कुमार यांनी 2013 च्या मॅच फिक्सिंग आणि बेटिंगमध्ये महेंद्रसिंह धोनी देखील सामील होता असा दावा केला होता.

दरम्यान, बार आणि बेंचने दिलेल्या वृत्तानुसार मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि सुंदर मोहन यांनी आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना या निर्णयाविरूद्ध दाद मागण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे. महेंद्रसिंह धोनीने उच्च न्यायालयात यापर्वी झी मीडिया संपत कुमार आणि इतरांवर मानहानीचा दावा ठोकला होता. न्यूज रिपोर्टमध्ये धोनी 2013 मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करणारे वक्तव्य केल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहचल्याचा आरोप धोनीने केला होता.

आयपीएल 2013 मध्ये झालेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणाचा प्राथमिक तपास आधी संपत कुमार यांच्याकडे होता. धोनीने या सर्वांना या प्रकरणात झी, संपत कुमार आणि इतरांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यात यावं अशी याचिका उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणात झी आणि कुमार यांना धोनीविरूद्ध वक्तव्य करण्यापासून रोखणारा आदेश दिला होता. यानंतर झी, कुमार आणि इतर लोकांनी लेखी उत्तर दिलं होतं. मात्र कुमार यांनी लेखी उत्तरानंतरही धोनीविरूद्ध बदनामी करणारी वक्तव्य त्यानंतरही केली. त्यामुळे धोनीने कुमार यांच्याविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये