“तीन मिनिटात सगळे ब्राह्मण आणि फडणवीसांना संपवतो”; उपमुख्यमंत्र्यांना धमकी देणारा गजाआड
मुंबई | तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो, देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) ठार करतो म्हणत धमकी देणारा किंचक नवले याला अटक करण्यात आली आहे. ७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवतो म्हणणारा हा किंचक नवले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Devendra Fadnavis Death Threat)
किंचक नवलेने काय केलं ?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Death Threat) यांच्याबाबत अत्यंत खालच्या भाषेत आणि प्रक्षोभक भाषेत किंचक नवलेने टीका केली. प्रक्षोभक भाषेत वक्तव्य करतानाचा किंचक नवलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच प्रकरणात किंचक नवलेला अटक करण्यात आली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किंचक नवलेचा शोध घेण्यात येत होता. तो वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आता सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिसांनी शनिवारी त्याला सातारा येथील बाजार या ठिकाणाहून अटक केली. याआधी योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या त्याचा तपास करत आहेत.