ताज्या बातम्यापिंपरी चिंचवड

तलवार बाळगल्या प्रकरणी मोशीतून तरुणास अटक

मोशी | विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशात पिंपरी चिंचवड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेआठ वाजता संतनगर चौकाजवळ मोशी प्राधिकरण येथे करण्यात आली.

अविराज भिमाशंकर घोडके (वय 21) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःजवळ तलवार हे शस्त्र बेकायदेशीरपणे बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 350 रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये