मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेचं तिकीट; मात्र जगदीश मुळीक यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
Pune Lok Sabha 2024 : भाजपने (BJP) लोकसभेसाठीच्या (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 20 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे.
यापूर्वी मात्र पुण्यातून लोकसभेसाठी जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचंही नाव चर्चेत होतं. दरम्यान काल रात्री मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज जगदीश मुळीक यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. “कोणतेही पद नसताना माझ्यासाठी जनता आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहता मी कायम कृतज्ञ आहे” असं मुळीक म्हणाले आहेत.
काय आहे फेसबुक पोस्ट?
जनतेच्या सेवेत कायमच! कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद.
आपलाच
जगदीश मुळीक