ताज्या बातम्यापुणे

ईडी ची धाड नाहीच : टीआरपी साठी डीएसके बद्दलची चुकीची बातमी

पुणे | पुण्यातील बहुचर्चित बांधकाम उद्योजक डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या नावाला असलेल्या टीआरपी चा वापर करून घेण्यासाठी आज काही वृत्तवाहिन्यांनी त्यांची बदनमी करत, त्यांच्या कार्यालयावर ई डी ची धाड पडली असल्याची बातमी चालवली. विशेष म्हणजे बऱ्याचश्या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी सरसकट ही बातमी प्रसारित केली.

राष्ट्र संचार डिजिटल ने याची अधिक माहिती घेतल्यावर समजले की, न्यायमूर्ती देशपांडे यांच्या न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी निकाल देत असताना सक्त वसुली संचालनालय म्हणजे ईडीला आदेश केला होता की , त्यांनी डीएसके यांच्या बंगल्यातील आणि कार्यालयातील कागदपत्रे घेण्यासाठी त्यांना मुभा द्यावी.

त्याप्रमाणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल DSK यांच्या बंगल्या मधून त्यांना कागदपत्रे, साहित्य, उपकरणे घेऊन जाण्यासाठी बंगला खुला केला तर आज शुक्रवार दिनांक 19 रोजी जंगली महाराज रोडवरील त्यांच्या कार्यालयातील साहित्य घेऊन जाण्यासाठी त्यांना कार्यालय खुले करून दिले. आज दिवसभर डी एस के DSK आणि त्यांचे कुटुंबीय या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य ,उपकरणे घेऊन जाऊ शकतात. संध्याकाळी पुन्हा ईडी करून हे कार्यालय सिल करण्यात येईल.

गेल्या पाच वर्षापासून या कार्यालयावर ईडीचाच ताबा आहे आणि कार्यालय त्यांच्याच ताब्यामध्ये आहेत, असे असताना त्यावर पुन्हा ई डी चा छापा कसा पडेल? परंतु आज सकाळी कार्यालयासमोर थोडीफार गर्दी दिसली की ,’ डीएसके यांच्या कार्यालयावर ईडीचे धाड पडली ‘ अशा बातम्या चालवून अनेकांनी टीआरपी मिळविण्याचा प्रयत्न केला.

याबाबत डीएसके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ‘न्यायालयीन आदेशाप्रमाणेच हे सर्व कामकाज चालू असून यातून मला दिलासा मिळाला आहे. ही कारवाई डीएसके यांच्या विरोधातील नाही. परंतु माझ्या बदनामीमुळे कोणला स्वतःचे भले करून घ्यायचे असेल तर ते घेवोत, मी माझी न्यायालयीन लढाई लढत राहील’ असे सांगितले. आज देखील NCALT मध्ये तारीख असल्यामुळे आपण दिल्लीला असल्याचे त्यांनी राष्ट्र संचारला सांगितले .


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये