पुणेकरांनी केला विश्वविक्रम; SP कॉलेजच्या मैदानात 3 हजारांहून अधिक पालकांनी मुलांना गोष्ट सांगत मोडला चीनचा रेकॉर्ड
पुणे | Guinness World Record Pune : पुणेकरांनी (Pune) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या (SP Collage) मैदानावर 3 हजारांहून अधिक पालकांनी त्यांच्या मुलांना गोष्ट सांगत हा विश्वविक्रम केला आहे. त्यामुळे आता हा गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर नोंद झाला आहे.
पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर तीन हजारांहून अधिक पालकांनी त्यांच्या मुलांना गोष्ट सांगत विश्वविक्रम केला आहे. तर या विश्वविक्रमाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
नॅशनल बुक ट्रस्टनं एसपी कॉलेच्या मैदानावर पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं गोष्ट सांगण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या उपक्रमामध्ये पुणे महापालिकेच्या शाळा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत. सोबतच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळा सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान, आत्तापर्यंत हा विश्वविक्रम चीनच्या नावावर होता. चीनमध्ये एकावेळी बावीसशे पालकांनी मुलांना गोष्टी सांगितल्या होत्या. तर आता पुणेकरांनी हा विक्रम मोडला आहे.