“हार्दिक पांड्याला ट्रोल करायचं थांबवा नाहीतर…”, मुंबई इंडियन्सनं रोहित फॅन्सला दिला थेट इशारा
Mumbai Indians | मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार पदावरून काढल्यामुळे त्याचे चाहते चांगलेच संतापले आहेत. हार्दीक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केल्याचा निर्णय रोहित शर्माच्या चाहत्यांना पटलेला नाहीये. त्यामुळे त्यांनी हार्दीक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तसंच मुंबई इंडियन्सचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स देखील झपाट्यानं कमी होत आहेत. यावरून आता MI च्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सनं चाहत्यांना ट्रोलिंग थांबवण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई इंडियन्सनं ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “आम्ही फॅन्सचा आणि त्यांच्या प्रतिक्रियांचा आदर करतो. पण काही असे फॅन्स आहेत जे हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. त्याच्या कुटुंबीयांवर देखील टीका करत आहेत. त्यांच्यावर अश्लिल भाषेत टीक करत आहेत. तर अशा सर्व टॉक्सिक फॅन्सला आम्ही ब्लॉक करत आहोत. जर त्यांनी अशा प्रकारे ट्रोल करणं थांबवलं नाहीतर आम्हाला कायदेशीर मार्गानं जावं लागेल”, असा इशारा ट्रोलर्सला देण्यात आला आहे.
मुंबई इंडीयन्सनं हा व्हिडीओ शेअर करताच या व्हिडीओवर देखील नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. तर या व्हिडीओत झळकणाऱ्या तरूणाला देखील चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तसंच या व्हिडीओनंतर मुंबई इंडीयन्सचे फॉलोअर्स आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.