आरोग्यबॅक टू नेचर

आनुवंशिक सिकल सेल ॲनिमियाचे परिणाम गंभीर

मराठी विज्ञान परिषदेतर्फे आरोग्यविषयक व्याख्यान

पुणे : “महाराष्ट्रात विशेषतः आदिवासींमध्ये २२.५ टक्के लोकांमध्ये सिकल सेल अ‍ॅनिमिया दिसून येतो. हा आनुवंशिक रोग आहे. याचे परिणाम गंभीर आहेत. सायप्रसमधील लोकांच्या प्रबोधनामुळे सिकल सेल नियंत्रणात आला. सामाजिक इच्छाशक्ती असेल भारतातही तसे करता येईल,” असे प्रतिपादन बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुदाम काटे यांनी केले. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने सिकल सेल (कोयताकार पेशी) आणि त्यांचे आरोग्यावर होणा परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

सिकल सेल बाधेवर काही उपाययोजना

“बेल, मका, सरपुंखा, कोरफड इ. वनस्पती वापरून प्रभावी आणि स्वस्त औषधे डॉ. काटे यांनी बनवली आहेत. सिकल सेलमुळे हिवताप होण्याचा धोका कमी होतो. माणसाने शेतीचा शोध लावल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढला. त्यातून सुटकेसाठी सिकल सेल बनले असावेत, असे शास्त्रज्ञ म्हणतात. विवाह जुळवताना वधूवरांची रक्त चाचणी करून पुढील निर्णय घेतला तर पुढच्या पिढ्या आनुवंशिक रोगांपासून मुक्त करता येतील.

मानवी रक्तात गोलाकार लाल रक्तपेशी शरीरभर ऑक्सिजन पुरवतात. काही स्त्री-पुरुषांमध्ये त्यात चंद्रकोरी किंवा कोयत्याच्या आकाराच्या असतात. त्यातून कमी ऑक्सिजन वाहून नेला जातो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील मेंदू, डोळा, हृदय, गर्भाशय अशा अवयवांच्या कार्यात बिघाड होतो. त्यामुळे रक्ताची तपासणी आवश्यक असते. सिकल सेलवर त्रास कमी करणा औषोधोपचार आहेत. पण ते खर्चिक आहेत. सातपुडा पर्वतातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधील आदिवासी पट्ट्यामध्ये चार हजाराहून अधिक सिकल सेल बाधितांवर उपचार केले आहेत. डॉ. सुदाम काटे यांनी दिलेल्या या माहितीमुळे उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले.

सिकल सेलचे आरोग्यावर काय परिणाम होतात? हा आजार आनुवंशिक आहे का? अन्य कोणत्या कारणांनी होऊ शकतो का? सिकल सेल बाधित व्यक्ती कशी ओळखावी? या बाधेवर काही उपाययोजना आहेत का? अशा व्यक्तींनी लग्न-संसार करावा का? आदी प्रश्नांची उत्तरे आणि अधिक माहिती डॉ. काटे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये