“…तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल”; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल
नाशिक : (Uddhav Thackeray On Narendra Modi) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, श्रीरामाला हायजॅक करण्याचा प्रयत्न करु नका, तो कोणत्याही एका पक्षाचा नाही. पण तुम्ही जर तसं करत असाल तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
ठाकरे म्हणाले, आज रामाचे मुखवटे घालून जे काही रावण फिरत आहेत, त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. काल तिकडे सर्व अंधभक्त जमले होते त्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांची बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी. पण तिथं कोणीतरी एकानं म्हटलं की, आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान. अजिबात नाही, त्रिवार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज राम मंदिर उभं राहुच शकलं नसतं.
कारण आज तुम्ही तिकडं जे काही जाऊन बसलात ते केवळ तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणूनच. अन्यथा हे कोणाही येऱ्यागबाळ्याचं काम नाही. म्हणूनच मी आज ठरवलंय की या मातीत ते तेज जन्माला आलं आहे. आज मोदी अयोध्येला गेलेत त्याआधी पंतप्रधान झाल्यानंतर कधी गेले नव्हते, त्यापूर्वी गेले असतील.