अदानीला प्रश्न विचारला अन् चमचे वाजले! उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
नागपूर : (Uddhav Thackeray On Raj Thackeray) दोन दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धारावी बचाव मोर्चा काढण्यात आला होता. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिथे नेमकं काय होणार आहे हा प्रश्न विचारला का? की मोर्चाने दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला होता.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काही वेळा प्रतिहल्ला केला. ते म्हणाले, मला आता कळायला लागलंय अदानीचे चमचे कोण-कोण आहेत. आम्ही अदानीला प्रश्न विचारला तर चमचे का वाजत आहेत! आंदोलन केल्यावर विषय काय हे विचारुन बोलतात. त्यामुळे अर्धवट माहितीवरुन कोणी प्रश्न विचारु नये. तसेच विमानाला टोल लागत नाही. शालीचं वजन पेलतंय का नाही हे त्यांनी बघायला पाहिजे, असा टोमणा त्यांनी मारला.
धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. कोणत्याही परिस्थितीत धारावीकरांचा विकास आम्हाला हवा आहे. याबाबत सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा अशी आमची इच्छा होती, असं ठाकरे म्हणाले.