पुण्यात विकृतीचा कहर… 24 वर्षीय तरुणाने केले म्हशीच्या रेडक्यावर लैंगिक अत्याचार
पुणे | मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील चांदोली वनपरिक्षेत्रात घोरपडीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर आता प्राण्यांवरच्या लैंगिक अत्याचाराची हादरवून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातून (Pune Crime News) समोर आली आहे. पिंपरी चिंचवड (PCMC) मधील चिखली परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय व्यक्तीने म्हशीच्या रेडक्याचे पाय बांधून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामकिशन श्रीराम भवन चव्हाण असं आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गणेश पंडित जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञाणेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका सोसायटीमध्ये उत्तर प्रदेश येथून राम किशन चव्हाण हा कामधंद्याच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात आला होता.
रामकिशन याच्या घराच्या बाजूलाच एक गाय आणि म्हशींचा गोठा आहे. त्या गोठ्यात म्हशीचे दीड वर्षाचे रेडकू होते. ही व्यक्ती म्हशीच्या रेडक्याचे हात पाय बांधून त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करत होता. रेड्यासोबत हा प्रकार 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत असाच सुरू होता. सोमवारी जेव्हा पुन्हा म्हशीच्या दीड वर्षाच्या रेडकूला गोठ्यात कुणीच नसताना राम किशनने हात पाय बांधुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर तो तेथून निघून गेला. गोठा मालक गणेश पंडित जाधव यांच्या वडिलांनी गोठ्यात पाहिले असता रेडकूचे हात पाय बांधलेले दिसले. त्यानंतर मात्र त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात रामकिशन हा रेडक्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची बाब उघडकीस आली. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर गोठ्याच्या मालकांनी त्याला पकडून चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.