ई-मेल हॅक, थेट राज्यपालांना मेसेज; राहुल नार्वेकरांसोबत नेमकं घडलं काय?
मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा ईमेल आयडी हॅक झाला आहे. विधानसभा अध्यक्षांचा ईमेल आयडी हॅक झाल्यामुळे राज्य सरकारच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या ईमेल आयडीवरून एक मेल देखील करण्यात आला आहे. थेट राज्यपाल रमेश बैस यांना मेल करून आमदार सभागृहात नीट वागत नसल्याची तक्रार या मेलमध्ये करण्यात आली आहे.
या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी आता मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाला आहे. त्या मेलवरुन राज्यपालांना मेल करण्यात आला. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सायबर सुरक्षेवर प्रश्न?
राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. विधानसभेतील अनेक संवेदनशील बाबी त्यांच्याकडे आहेत. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यापूर्वी शिवसेना कोणाची याचाही निकाल दिला होता. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना मेल करण्यात आला होता. यामुळे त्यांचा मेल हॅक होण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु एकंदरीत विधिमंडळातील सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे.