“ईडी केंद्र सरकारचं पोपट आहे, जिथे भाजपचा पराभव होतो तिथे…”; संजय राऊतांचं टीकास्त्र
मुंबई | Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ईडी आणि निवडणूक आयोग हे केंद्र सरकारचे पोपट आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तसंच भाजपचा (BJP) जिथे पराभव होतो तिथे ईडी कारवाई करते, असा गंभीर आरोप देखील राऊतांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, भाजपचा जिथे पराभव होतो तिथे ईडीची कारवाई सुरू होते. कारण ईडी आणि निवडणूक आयोग हे केंद्र सरकारचे पोपट आहेत. याचा आम्हाला अनुभव आहे. ही परिस्थिती 2024 पर्यंत अशीच राहणार आहे. ईडी, सीबीआयप्रमाणे निवडणूक आयोग देखील भाजपच्या पिंजऱ्यातला पोपट आहे.
शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्र इलेक्शन कमिशनरनं ज्या पद्धतीनं निर्णय घेतला तो पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली घेतला आहे. शिवसेनेचे वीस पंचवीस आमदार गेले तर संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवावी. यावरून इलेक्शन कमिशनची नियत, बिघडलेले चरित्र दिसते. त्यामुळे अशा कमिशनकडे जाऊन आम्हाला काय न्याय मिळणार आहे.