वंशाला दिवा पाहिजे म्हणून दुसऱ्या लग्नाचा विचार, कुणकुण लागताच पत्नीने केले भयानक कृत्य
पिंपरी-चिंचवड | शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आठ मुली परंतु वंशाचा दिवा नसल्याने दुसऱ्या लग्नाच्या विचारात असलेल्या पतीच्या हत्येचा कट रचत घराशेजारी राहणाऱ्या दोघांना तब्बल ५ लाख रुपयांची सुपारी दिली. यानंतर आरोपींना फोन करत पती घरी असल्याची माहिती देत घरी बोलवले. आरोपींनी घरात घुसून पतीवर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना आणि मिठाईलाल बरुड हे पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथे राहतात. या दोघांना आठ मुली आहे. मिठाईलाल यांना वंशाचा दिवा होता. त्यांना मुलाची अपेक्षा होती. मात्र, मुलगा होत नसल्याने ते दुसरे लग्न करण्याचा विचारात होते. याची कुणकुण ही पत्नी रत्ना हिला लागली. दरम्यान, मुलासाठी मिठलाल हा पत्नी रत्नाचा छळ करत होता. दरम्यान, रत्नाने पती मिठाईलालची हत्या करण्याचे ठरवले. गेल्या महिन्यात तिने पतीला मारण्यासाठी प्लॅन तयार केला. शेजारी राहणारे सराईत गुन्हेगार शिवम दुबे आणि अमन पुजारी यांना रत्नाने पाच लाखांची सुपारी दिली. तसेच ऍडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये देखील दिले.
गुरुवारी (दि ७) रात्री ९ वाजता रत्ना ही फिरण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. यावेळी तिने अमन पुजारी ला फोन करत मिठलाल घरी झोपला असल्याची माहिती दिली. रत्नाने घरातील टीव्ही जवळ कोयता देखील आणला होता. अमन आणि शिवम यांनी ही संधी साधून बेडरूममध्ये झोपलेल्या मिठाईलालवर चाकू आणि कोयत्याने पाठीतून पोटात चाकुने भोकसले, चेहऱ्यावर, हातावर २१ ते २२ वार केले. यावेळी घरात मुली होत्या. त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी शिवम आणि अमन फरार झाले. गंभीर असलेल्या मिठाईलाल यांना तातडीने मुलींनी व त्याच्या नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.
मुलींनी आरोपींना माहिती दिली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांनी मिठाईलाल याच्यावर जीवघेणा हल्ला का? असे विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, यानंतर त्यांना पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी खरे सांगितले. पत्नी रत्नानेच पती मिठाईलाल याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले. तसेच दुसरं लग्न आणि सात मुली असल्याने छळ होत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान हे करत आहेत.