महाराष्ट्र

कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर

गाड्यांंच्या थांब्यासाठी दहा क्रॉसिंग स्थानके

मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेळ वाचावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गंत क्रॉसिंग स्थानक प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली. या प्रकल्पांतर्गत कोकण रेल्वे मार्गावर दहा नव्या क्रॉसिंग स्थानकांचा समावेश झाल्याने कोकण रेल्वेचा प्रवास सुखदायी होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर क्रॉसिंग स्थानकांची संख्या दहा आहे. त्यात इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कळबनी, कडवई, वेरावली, खारेपाटण, आर्चिणे, मिरजन, इनजे अशा दहा क्रॉसिंग स्थानकांचा समावेश आहे. कोकणाकडे प्रवासी आणि मालगाड्या मोठ्या संख्येने धावतात. सध्या वीर ते रोहा अशा ४६ किलोमीटर मार्गाचेच दुहेरीकरण झाले आहे. गर्दीच्या वेळी जादा गाड्या सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतूक कोलमडते. त्यामुळे कोकण रेल्वेवर झालेल्या क्रॉसिंग स्थानक प्रकल्पामुळे रेल्वेला आणि प्रवाशांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोकण रेल्वेवर आठ लूपलाईनही सेवेत आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि हे फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्ण झाले. अधिक संख्येने गाड्यांना सामावून घेण्यासाठी आणि ट्रेनचे कामकाज सुलभ करण्यासाठी स्टेशन परिसरात लूपलाइन तयार केल्या जातात. ज्यामध्ये अनेक इंजिनांसह पूर्ण लांबीची मालगाडी बसू शकते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये