पुढील 24 तासात पुण्यासाह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता!
Maharashtra Weather Updates : राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढत आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा अंदाज बांधला जात आहे. काही भागात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. तर, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत आजपासून येत्या 18 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे, याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक भगात गेल्या दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. ज्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.