”याचसाठी केला होता अट्टाहास….” राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंचं वक्तव्य
पुणे | वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेचा (MNS) राजीनामा दिला. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनीदेखील धडाधड राजीनामे दिले. अशातच वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चा रंगल्या असतानाच वसंत मोरेंनी महाविकास आघाडीती प्रमुख्य नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता वसंत मोरेंनी थेट संजय राऊतांची (Sanjay Raut) मुंबईत जाऊन भेट घेतली आहे.
दरम्यान वसंत मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ”सगळ्या नेत्यांना मी भेटलो आहे. मला वाटतं की, मला जी निवडणूक करायची आहे. ती पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे पहिले गाठीभेटी घेतोय. त्यानंतर ते योग्य तो मार्ग काढतील” असे टे म्हणाले. नेत्यांच्या भेटीनंतर पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले की, ”माझ्या कोणत्याही भेटी या मागच्या दरवाज्यातून झालेल्या नाहीय. मी प्रत्येक ठिकाणी जातोय आणि डायरेक्ट भेटतोय. मी कोणतीच भेट ही अंधारात किंवा पडद्याआड माझी कोणतीच मिटींग झालेली नाहीय. मी ज्या ठिकाणी जातोय त्या प्रत्येक ठिकाणी मला सगळे नेते समजून घेत आहे आणि हे मी माझं भाग्य समजतो. मी ज्या पक्षामध्ये होतो, त्या पक्षातून मी इथपर्यंत पोहोचलो.”
रवींद्र धंगेकरांबाबत प्रश्न केला असता, ते म्हणाले की ”मी पुण्यात गेल्यावर धंगेकरांशी चर्चा करणार आहे. माझा प्रस्ताव मी त्यांच्याजवळ मांडेल. माझा जो प्रस्ताव आहे तो मी शरद पवारांकडे, संजय राऊतांकडे आणि पुणे शहर कॉंग्रेसकडे मांडलेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार होईल”, असा विश्वास मोरेंनी यावेळी दर्शवला आहे. महाविकास आघाडीकडून प्रतिसाद मिळाला नाहीतर लोकसभेसाठी ठाम आहात का? असं विचारलं असता वसंत मोरे म्हणाले की, ”याचसाठी केला होता अट्टाहास….मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला. त्या विषयापासून मी लांब गेलेलो नाहीय आणि जाणारही नाही.