ताज्या बातम्या

पुण्यात पाणीबाणी! पाणीचोरी रोखण्यासाठी १४४ कलम लागू

Pune water crisis : तीव्र उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे खडकवासला धरणातील पाण्यासाठ्यात कमालीची घट झाली आहे. येथे सध्या उपयुक्त पाण्यासाठा फक्त २९.९५ दलघमी शिल्लक आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद अलर्टमोडवर आले आहे. सध्या जिल्ह्यात पाण्याच्या योग्य नियोजनाकडे प्रशासनाचे लक्ष असून पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

सध्या ग्रामीण भागासाठी नवीन मुठा कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. या कालव्यातून भरून पाणी वाहत असून या पाण्यावर काही जणांचा डोळा आहे. हे पाणी ग्रामीण भागात पोहचे पर्यंत यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा उपसा केला जात असल्याचे पुढे आले आहे. यामुले ही पाणी चोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने खडकवाला प्रकल्पाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कालवा परिसरात जमावबंदी लागू करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ही मागणी मान्य केली असून दोन्ही कालव्याच्या बाजूने १४४ कलम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

तिघांना केली अटक

खडकवासला उजव्या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना शिर्सुफळ येथे अटक करण्यात आली आहे. हा अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खडकवासलाधरण ते इंदापूरपर्यंतच्या संपूर्ण कालवा परिसरात जमावबंदी प्रतिबंधक १४४ कलम लागू केले आहे. पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी हे आदेश दिवसे यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये