फिचरफुड फंडा

स्वादिष्ट मोमोजच्या आस्वादासाठी… द मोमो पांडा

मोमोज म्हटले, की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोमोजचा आस्वाद घ्यायला आवडतेच. खवय्ये मोमोज खाण्यासाठी कोणतीही वेळ पाहत नाहीत. जशी चव सुटेल तसे ते मोमोजचा आस्वाद घ्यायला जातात. तर असेच मोमोजप्रेमी एखाद्या प्रसिद्ध मोमोज कॅफेच्या शोधात असतात. अशाच खवय्यांसाठी द मोमोज पांडा हे कॅफे प्रसिद्ध आहे. द मोमोज पांडा या कॅफेने मोठ्या प्रमाणात खव्वयांना भुरळ घातली आहे. द मोमोज पांडा हे कॅफे ओंकार परांजपे यांचे आहे. हे कॅफे शॉप नं. २९, बिल्डिंग डी १, गंगा भाग्योदय, सिंहगड रोड, माणिकबाग, पुणे येथे आहे. विशेष म्हणजे द मोमोज पांडा या कॅफेने खवय्यांना इतकी भुरळ घातली आहे, की तेथे ते चांगलीच गर्दी करताना दिसतात.

या कॅफेच्या प्रसिद्ध मोमोजसोबत त्यांच्या कॅफेची केलेली आकर्षक रचना मोमोजप्रेमींना आकर्षित करते. तसेच या कॅफेत मिळणारे मोमोज सर्वसामान्यांपासून प्रत्येकाच्याच खिशाला परवडतील याच दरात मिळतात. द मोमोज पांडा या कॅफेची तंदुरी मोमोज, चिकन स्टीम मोमोज, फ्राईड व्हेज मोमोज, व्हेज स्टीम मोमोज, पनीर फ्राईड मोमोज, व्हेज चीज मोमोज, चिकन पेरी पेरी मोमोज असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहेत. सोबतच लेमन आईस टी, पिच आईस टी, ब्लॅक करंट हे स्वादिष्ट पेयदेखील या कॅफेत मिळतात. द मोमोज पांडा या कॅफेला तरुणाईने चांगलीच पसंती दर्शवली आहे, तर तुम्हालादेखील स्वादिष्ट व्हेज-नॉनव्हेज मोमोजचा आस्वाद घ्यायचा असेल तर आवर्जून द मोमोज पांडा या कॅफेला भेट द्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये