फिचरफुड फंडाराष्ट्रसंचार कनेक्ट

यम्मी रोल्ससाठी…रोल पॅाईंट कॅफे

रोल्स म्हणजे तरुणाईचा सगळ्यात आवडता पदार्थ. यम्मी आणि स्पायसी रोल खाण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करत असते. मग कॉलेज जाताना किंवा पार्टी करायची असेल तर मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आवर्जून वेगवेगळ्या स्वादिष्ट रोल्सचा आस्वाद घ्यायला जातच असतात. तर असे रोल्सप्रेमी एखाद्या प्रसिद्ध रोल्स कॅफेच्या शोधात असतात. अशाच खवय्यांसाठी रोल पॅाईंट हे कॅफे प्रसिद्ध आहे. या कॅफेने खवय्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

रोल पॅाईंट हे कॅफे अविनाश कांबळे यांचं कॅफे आहे. हे प्रसिद्ध कॅफे मेडिकल कॅालेज रोड, चंद्रभागानगर, धनकवडी, पुणे येथे आहे. रोल पॅाईंट कॅफेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वादिष्ट रोल्सचा आस्वाद घ्यायला जातच असतात. तसेच या कॅफेत बसण्यासाठी प्रशस्त जागा, रोल्सची कायम ठेवलेली चव आणि त्यांचे आदरातिथ्य यामुळे हे कॅफे रोल्सप्रेमींच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. त्यामुळेच या कॅफेत पुण्यासह बाहेरून पुण्यात येणारे खवय्येदेखील रोल्सचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. तसेच या कॅफेत पार्टी ऑर्डरदेखील स्वीकारल्या जातात. तसेच रोल्स आणि अन्य पदार्थांची घरपोच सेवाही
दिली जाते.

रोल पॅाईंट कॅफेची व्हेज मसाला रोल, चीज रोल, पनीर टिक्का रोल, नुडल्स रोल, पनीर चिली चीज रोल, शॉरमा, चिकन चिली रोल, पनीर बटर मसाला रोल, पनीर चिली रोल असे अनेक रोल्सचे प्रकार त्यांची खासियत आहेत. त्यामुळे या कॅफेत रोल्सप्रेमी नेहमी येतातच. त्यामुळे तुम्हालादेखील स्वादिष्ट आणि चमचमीत रोल्सचा आस्वाद घ्यायचा असेल, पार्टी करायची असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की रोल पॅाईंट कॅफेला भेट द्या. कारण एकदा तुम्ही या कॅफेत येऊन रोल्सचा आस्वाद घ्याल तर नक्कीच तृप्त होऊन जाल आणि पुन्हा पुन्हा याल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये