आरोग्यताज्या बातम्यापिंपरी चिंचवड

औद्योगिक वसाहतींमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात; नदीवर पाण्याचा फेस

Pune Indrayani River Pollution : पुण्यातील देवाच्या आळंदीत (Alandi) हिमनदी अवतरली हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण इंद्रायणी नदीत तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणारी इंद्रायणी अक्षरशः फेसाळली (Pune Indrayani Water River Pollution) आहे. वारकरी अन स्थानिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. फक्त आषाढीलाच राज्यकर्त्यांना इंद्रायणीची आठवण होते, असं सामान्य वर्गातून म्हटलं जातंय.

https://www.instagram.com/reel/CziWepep24A/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत इंद्रायणीत दररोज 65 एमएलडी सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पीएमआरडीएकडून याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. राज्य शासनाने हा अहवाल स्वीकारला असून तो अंतिम मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील एकूण 54 गावे, शहरांमधून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून नदी प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.(PCMC)

यामध्ये प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी या तीन नगरपरिषदा, वडगाव आणि देहू या दोन नगरपंचायत, देहू कटक मंडळ, 15 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायती, इतर 46 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. केंद्र, राज्य शासनाकडून प्रदूषण नियंत्रण या कामास भांडवली किमतीच्या 60:40 टक्के प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. 577.16 कोटी रकमेचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने स्वीकारला असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये