फिचरमहाराष्ट्रमाय जर्नीसक्सेस स्टोरी

प्रणव सातभाई यांचा पोर्ट्रेट कलेतून विश्वविक्रम

कोरोना महामारी आली आणि प्रत्येकाला घरात बंदिस्त व्हावं लागलं. पहिले २ ते ३ महिने प्रत्येकाने आनंदात घालवले; परंतु हाताला काम नसल्यामुळे वेळ काही जात नव्हता. अशा परिस्थितीतही आपल्या कलेशी एकरूप होऊन काम करणाऱ्या व्यक्तीदेखील होत्या. अशाच संधीचं सोनं करून स्वतःच्या कलेला विश्वविक्रमापर्यंत घेऊन जाणारे प्रणव सातभाई. ते मूळचे नाशिकचे असून, वैद्यकीय कुटुंबात लहानाचे मोठे झाले.

त्यांनी एका वर्षामध्ये हजाराहून अधिक डिजिटल पोर्ट्रेट प्रत्यक्षात बनवले असून, कमी काळात आणि फक्त बाविसाव्या वर्षी विश्वविक्रम करणारे तरुण ठरले आहेत.अनेक युवकांसाठी प्रणव हे प्रेरणास्रोत बनले आहेत. प्रणव यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. त्यामुळे बारावी झाल्यानंतर नक्की काय करणार हा असं त्याच्या आई-वडिलांना वाटत होतं. छंद, प्रचंड हुशारी, तितकीच सर्जनशीलता असलेल्या प्रणव यांनी डॉक्टर व्हावे आणि फोटोग्राफीकडे केवळ छंद म्हणूनच पाहावे, ही खरं तर घरच्यांची इच्छा होती; पण क्रिएटिव्हिटी आतूनच असावी लागते.

त्यांनी तीन‍ वर्षांच्या डिजिटल फोटोग्राफीच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. यासोबत व्यावसायिक पातळीवर फोटोग्राफर म्हणून कामाला सुरुवातही केली. परंतु अचानक २०१९ ला लॉकडाउन पडलं आणि कॉलेज वगैरे सगळं बंद झालं. दुसऱ्या लॉकडाउनमध्ये मात्र आपण घरात बसून काही तरी वेगळं शिकलं पाहिजे, तसेच आपल्याकडे असलेले व्हिडिओ एडिटिंगसारखे स्किल वापरावे हे जाणून प्रयत्न केला. सुरुवातीची त्यांची ६०-७० पोर्ट्रेट चुकली. तरीही त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. एके दिवशी त्यांनी सहज म्हणून अभिनेते शरद पोंक्षे यांचे पोर्ट्रेट तयार केले आणि सोशल मीडियावर शेअर केले. ते पोर्टेट पोंक्षे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं. ही प्रणव यांना त्यांच्या कामाची मिळालेली पहिली पावती होती. केवळ मराठी आणि हिंदी कलाकारांचेच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांचेदेखील हुबेहूब डिजिटल पोर्ट्रेट ते बनवतात.

प्रणव सांगतात, की त्यांनी नाना पाटेकर यांचं एक पोर्टेट बनवलं होतं. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर नाना पाटेकर यांनी कॉल करून त्यांच्या या कलेचं भरभरून कौतुक केलं. दिलीप प्रभावळकर, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचे पोर्टेट साकारले. प्रणव सांगतात, की आज मी जो काही आहे, तो सोशल मीडियामुळे. मला प्रत्येक गोष्ट तिथून शिकता आली. माझ्या कलेची दाद सोशल मीडियामुळे लोकांनी घेतली. अनेक पोर्टेट भारताबाहेर जातात, याचा मला आनंद आहे. जिद्द आणि चिकाटी धरून तुम्हाला हवं ते करा, यश नक्की मिळते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये