ताज्या बातम्यापुणे

‘हू इस धंगेकर’ नंतर आता ‘पवारांना संपवायचेय’

पुणे | कसबा विधानसभा पोट निवडणुकीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे ‘हू इज धंगेकर’ हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले की लोकांनी या अहंकाराची जागा दाखविण्यासाठी जणू काही धंगेकर यांना भरभरून मतदान केले.

‘हू इज धंगेकर’ हे सांगत असताना चंद्रकांत दादांनी कमालीच्या अहंकारपणाचे दर्शन घडविले असे भाजपा कार्यकर्ते देखील म्हणत होते. त्यामुळे एक अत्यंत नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. आजपर्यंत ही रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रत्येक मुलाखतीत त्यांना याबाबत प्रश्न विचारला जातो. चंद्रकांत दादा यांनी या लोकसभा निवडणुकीत देखील काल, ‘शरद पवारांना संपवायचे आहे’ असे पोटतिडकीने सांगत एक नवा वाद समोर आणला आहे.

हाताची बोटाच्या टिचकी वाजवत, माझे लक्ष्य फक्त शरद पवार (Sharad Pawar) आहेत. आम्हाला शरद पवार संपवायचे आहे. आम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना… ‘ शरद पवार संपवायचे .. बास !’ असे हे त्यांचे वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यातून देखील भाजपाची सूडबुद्धी आहे का ? अशी चर्चा होत आहे. त्यामुळे हू इज धंगेकर नंतर आता ‘शरद पवार यांना संपवायचे’ हा सिक्वेल राजकारणामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आणला, अशी चर्चा होत आहे. पूर्वीच्या वक्तव्याचा विपरीत परिणाम झाला. आता दादांच्या या नव्या वक्तव्याचा काय परिणाम होतो हे पाहुयात !

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये