ताज्या बातम्यामुंबई
सलमान खानच्या मेहुण्याच्या गाडीचा अपघात; मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरुन दिली धडक
मुंबई | अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) मेहुणा आयुष शर्माच्या (Aayush Sharma) गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार मुंबईमध्ये हा अपघात घडला आहे. ‘झूम रिपोर्ट’नुसार, अपघाताच्या वेळी अभिनेता त्याच्या कारमध्ये उपस्थित नव्हता, तर त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खार जिम खान्याजवळ घडली असून, मद्यधुंद अवस्थेतील एका कार चालकाने आयुषच्या कारला समोरुन धडक दिली. या मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सध्या आयुषच्या ड्रायव्हरची परिस्थिती ठीक आहे. अभिनेता आयुष हा सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा नवरा आहे. या अपघाताविषयी अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.