देश - विदेश

शेअर बाजार आपटला! सेन्सेक्स – निफ्टी दोन्हीची घसरण, गुंतवणूकदारांचे निघालं दिवाळं

मुंबई : (Share Market Latest Update) शेअर बाजारासाठी (Share Market Update) रोज चढ-उतार होत असतो. मात्र, आजचा दिवस हा काळा दिवस ठरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये तब्बल 1053 अंकांची घसरला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 330 अंकांने खाली आली आहे. केवळ फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला असून अनेकांचे दिवाळे निघाले आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा अमेरिकन शेअर्सकडे कल वाढल्याने जगभरातील अनेक शेअर बाजारांना त्याचा फटका बसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 8 लाख कोटी रूपयाहून अधिक नुकसान झाले असून कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत.

शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली असून बाजार बंद होताना त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्समध्ये 1.47 टक्क्यांची घसरण होऊन तो 70,370 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.53 टक्क्यांची घसरण होऊन तो 21,241 अंकांवर पोहोचला. तर बँक निफ्टीमध्येही 2.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 45,006 अंकांवर पोहोचला.

बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
आज इंडसइंड बँक, कोल इंडिया, एसबीआय इन्शुरन्स, बीपीसीएल आणि एचयूएल यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाल्याचं दिसून आलं. शेअर बाजार घसरण्यामागे तीन प्रमुख कारणं सांगण्यात येत आहेत.

एक तर HDFC सह अनेक बँकांचे शेअर घसरले आहेत. दुसरं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले आहेत आणि तिसरं कारण म्हणजे अमेरिकन शेअर्समधून मिळणारा परतावा वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जगभरातील शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेत अमेरिकेत गुंतवत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये