फिचरमहाराष्ट्रराष्ट्रसंचार कनेक्ट

किचनमधील ‘या’ गोष्टींनी चमकवा पितळेची भांडी

प्रत्येकाच्या घरात पितळेची भांडी असतातच. त्यामुळे प्रत्येकजण या भांड्यांची चकाकी टिकवून ठेवतो. पण पितळेची ही भांडी जर वेळेवर धुतली नाही तशीच ठेवलीत तर ती भांडी काळसर दिसू लागतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या साहित्याचा वापर करूनही तुम्ही ही भांडी चमकवू शकता.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा स्वयंपाकघरात वापरला जातोच. बेकिंग सोड्याचे अनेक फायदे आहेत. तो जेवढा स्वयंपाकघरात वापरला जातो तेवढेच त्याचे आरोग्यासाठी देखील फायदे आहेत. सोबतच बेकिंग सोड्याचा भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील उपयोग होतो. कोमट पाण्यात बेकिंग सोडा घालून ते चांगले मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण पितळेच्या भांड्याला लावून ठेवा आणि तसेच 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते भांडं ब्रशने घासून धुवून घ्या. या उपायाने पितळेच्या भांड्यांना एक वेगळीच चमक येते, असे सांगतात.

व्हिनेगर
बहुतेक लोकांच्या स्वयंपाक घरात व्हिनेगर असतेच. तर आपण व्हिनेगरचा वापर जेवण बनवताना किंवा इतर गोष्टींकरता करतो. तसेच स्वयंपाकघर साफ करण्यासाठीही व्हिनेगरचा वापर केला जातो. सोबतच व्हिनेगरचा वापर करून तुम्ही पितळेची भांडी देखील चमकवू शकता. व्हिनेगरच्या साहाय्याने पितळेच्या भांड्यांचा काळसरपणा काढू शकता. यासाठी एक पॅन घेऊन त्यामध्ये मैदा, व्हिनेगर आणि पाणी घाला आणि गोंद सारखे बनवा. ते गोंद थंड झाल्यावर काळसर झालेल्या भागावर लावा आणि १५ मिनिटे ठेवा. नंतर ते ब्रशने चांगले घासून घ्या. यामुळे पितळेची भांडी चकाकून निघू शकतील असे सांगितले जाते.

मीठ-लिंबाचा वापर
घरात शक्यतो मीठ आणि लिंबू हे पदार्थ असतातच. या मीठ आणि लिंबाचा वापर करता येईल. लिंबू आणि मिठाचा वापर करून पितळेची भांडी चकाकून निघू शकतात. यासाठी जो उपाय सांगितला जातो तो असा- यासाठी वाटीत लिंबाचा रस घेऊन त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून चांगले मिसळा. हे मिश्रण पितळेच्या भांड्यावर लावा आणि ब्रशने ते घासून घ्या, नंतर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे पितळेच्या भांड्याचा संपूर्ण काळसरपणा निघून जाण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये