मुल होत नाही म्हणजे तृतीयपंथीयाचा.. विवाहितेसोबत संतापजनक कृत्य, संभाजीनगर हादरलं
छत्रपती संभाजीनगर | राज्यात जादूटोणा करून शोषण करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकारांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात भरडल्या जात आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा अमानुष छळ करण्यात आला आहे.
तुझ्या अंगात तृतीयपंथीयाचा आत्मा आहे, त्यामुळे मुलबाळ होत नाही.. असे सांगून महिलेचा छळ करण्यात आला आहे. मूलबाळ होण्यासाठी तो आत्मा बाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीने मारहाण करून अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे हा प्रकार घडला असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहित महिला ही गंगापूर शहरातील आहे. महिला ३५ वर्षाची आहे लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर देखील महिलेला मूलबाळ होत नसल्याने घरात तीला सतत अपमानास्पद वागणूक मिळत असे. मूलबाळ होण्यासाठी अनेक उपाय देखील करण्यात आले. सतत होणाऱ्या छळाला महिला कंटाळली होती. अखेर जवळच्या एका नातेवाईकांनी तुझ्या अंगात तृतीयपंथीयचा आत्मा आहे. तो बाहेर काढण्यासाठी जादूटोणा करण्याचा सल्ला दिला.
जामगाव येते गेल्यानंतर महिलेला अंगातील आत्मा बाहेर काढण्यासाठी काठीने मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतरही आत्मा बाहेर निघत नाही, असे म्हणत तिच्या अंगावर खिळे मारण्यात आहे. एक दोन नाही तर तब्बल दोन वर्षे हा अघोरी प्रकार सुरू होता. डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ पर्यंत हा अत्याचार सुरू होती. शेवटी छळ सहन न झाल्याने महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली आहे.