“८३ वर्षाच्या बापाला फिरून त्यांना मतं मागावी लागतात..” चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका
रायगड | रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी रायगड जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आदिती तटकरे, रूपाली चाकणकर आणि आधी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केली आहे.
लोकसभेचा निकाल लागल्यानंतर बारामतीमधील विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आम्ही रायगडचा गुलाल उधळायला येणार आहोत, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समाचार घेतला आहे. स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही म्हणून ८३ वर्षाच्या बापाला फिरून लेकीसाठी मतं मागावी लागतात, अशा शब्दात चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना सुनावले आहे.
बारामती मतदारसंघांमध्ये लेक प्रचाराला फिरते जिथे वेळ मिळेल तिथे सांगते ‘दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लेकीसाठी बाप बुलंद कहाणी’, मला वाटतं आता हे बदललं पाहिजे. पंधरा वर्ष सत्ता दिली, पण स्वतःची ओळख निर्माण करता आली ना, ही म्हणून ८३ वर्षाच्या बापाला फिरून त्यांना मतं मागावी लागतात. तटकरे साहेब तसं तुमचं नाही तुमची लेक स्वतःच्या हिमतीवर मतं मागते. तुमच्यासाठी लेख फिरते त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो की त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. स्वतःच्या माध्यमातून केलेली विकास काम करताना त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.
टीका करताना नेहमी भान असलं पाहिजे याचं भान या विकत आणलेल्या लोकांना असले पाहिजे. गाडी-माडीपर्यंत ठीक होते, चारचाकी लांबलचक गाड्या सगळ्यांच्या असतात. पण, ज्यांच्या समोर ही भाषणे झाली त्यांची कोणाची घरं कौलारू आहेत. पण, बायकोच्या सिल्क साडीपर्यंत कोण जात असेल तर मग आम्ही गप्प बसू का? असाही इशारा चाकणकर यांनी यावेळी सुषमा अंधारेंना दिला. दुर्दैवाने देवाने त्यांना रूप उंची नसेल दिली, म्हणून मनामध्ये एक न्यूनगंड असतो की आपल्याला देवाने काहीच दिले नाही, पण मन तरी साफ असावं. पण, दुर्दैवाने ते मनही साफ नाही, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती टीका केली आहे.