पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार; फिल्मी स्टाइलने पाठलाग करुन गोळीबार
पुणे | सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. पुण्यामध्ये भरदिवसा हत्या, हत्येचा प्रयत्न होत असे गुन्हे घडत आहेत. अशातच मुळशी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. नव्या उर्फ नवनाथ निलेश वाडकर (वय १८) असे मुसक्या आवळलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. मात्र, पोलिसांना त्याचे तांत्रिक विश्लेषण मिळाले होते. त्यावरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील पर्वती भागात नवनाथ वाडकर हा वास्तव्यास होता. तो सराईत गुन्हेगार आहे. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तो काही दिवसांपासून फरार होता. गुन्हे शाखेतील पोलिस काही दिवसांपासून त्याच्या मागावर होते. मात्र, आज सकाळच्या सुमारास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नवनाथ वाडकर हा मुळशी तालुक्यातील मुठा गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले. पोलिसांना पाहून वाडकर पळू लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्याने पळता पळता पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी देखील त्याच्या दिशेने तीन ते चार गोळ्यांचे फायारींग केले. मात्र, तरीही तो पळत होता. अखेर पोलिसांनी काही अंतर जात नवनाथ वाडकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंगळवारी हा प्रकार घडला आहे.