आरोग्यराष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचरसंडे मॅटिनी

वंध्यत्व व होमिओपॅथिक उपचार

डॉ. सौ. सपना सुनील गांधी, M.D. (Hom.) S.C.P.H. (Mumbai)

वंध्यत्व- जर जोडप्याला लग्नाला १ वर्ष पूर्ण होऊनही प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला वंध्यत्व म्हणतात.
एक सासूबाई आपल्या थोरल्या सुनेला घेऊन माझ्याकडे आल्या व म्हणाल्या, अहो मॅडम, आमच्या पोराच्या लग्नाला सहा वर्षं झालीत, पण अजून पाळणा हलला नाही. त्यांच्या मागून धाकट्या दोन्ही पोरांची लग्नं झाली व त्या दोघांना ही १-१ मूल झालंयसुद्धा, पण या थोरलीला अजून काहीच नाही. बघा समदीकडील मोठ-मोठे दवाखाने पालथे घातले. शिवाय ते डॉक्टर म्हणतील त्या सर्व तपासण्या व उपचारही केले. तपासण्यांमध्ये दोघांमध्ये समदं नॉर्मल हाय म्हणतात, तर मग ह्यांना अजून मूल का होत नाही? आजचा प्रश्न खूप गंभीर व नाजूक असाच होता.

मग मी त्या आजींना वंध्यत्व म्हणजे काय, त्याची कारणे काय-काय असू शकतात व त्यावर होमिओपॅथिक उपचार कसा फायद्याचा होतो, हे सर्व सांगायला लागले, सुरुवातीला मूल होणे व न होणे हे एखाद्या स्त्रीवरच अवलंबून नसते, तर त्यात पुरुषही तितकाच कारणीभूत आहे. म्हणजे दोघांपैकी एकात किंवा दोघांच्यातही दोष असू शकतो. ज्याप्रमाणे (Report) रिपोर्ट सांगतील त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार करून घ्यावे लागतात. पण जर दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल असतील, तर मग नक्कीच मानसिकता विचारात घ्यावी लागते. म्हणजे त्यांच्यात शारीरिक दोष नसून मानसिक दोष असू शकतात. उदा- ताणतणाव, भीती, चिंता, दडपण, लहानपणी एखाद्या गोष्टीचा धक्का घेणे, घरातील लोकांचा त्याच्यावर अतिधाक असणे, अतिहळवा स्वभाव अशी अनेक कारणे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडथळे आणू शकतात. पण होमिओपॅथिक चिकित्सेत शरीराबरोबर मनाचाही तितकाच खोल अभ्यास केला जातो. त्यामुळे त्या रुग्णातील शारीरिक दोषाबरोबर मानसिक दोष निवारण हे होमिओपॅथिकशास्त्र चांगल्या प्रकारे करते.

वंध्यत्व –

      अ) स्त्री             ब) पुरुष

अ) स्त्री : स्त्रियांची मासिक पाळी व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला येणे महत्त्वाचे असते. तसेच अंडाशयातून अंडे परिपक्व होऊन पाळीच्या मध्यावर (१२ ते १८ दिवसांच्या काल्यावधीत) योग्यरीतीने बाहेर पडणेही महत्त्वाचे असते. शिवाय ते अंडे व शुक्रबीज यांचे मिलनही (Fallopion Tube) फॅलोपियन ट्यूबमध्ये होऊन ते गर्भाशयाच्या पिशवीत (Uterus) मध्ये आपली जागा होऊन रुजणे/ वाटणे हेही सर्वात महत्त्वाचे असते. शिवाय स्त्री शरीरातील सर्व हार्मोन्सचे संतुलन असणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
ब) पुरुष : पुरुषांमध्ये (Testicles) टेस्टिकल्समध्ये सशक्त निर्माती होऊन ती स्त्रीच्या योनीमार्गात प्रवेश होणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. दोघांच्या वरील क्रियेमध्ये काही दोष असतील तर Pregancy राहण्यासाठी अडथळे येऊ शकतात. शिवाय त्याची सर्वसाधारण प्रकृती ही महत्त्वाची आहेच. त्या दोघांबरोबर चर्चा करून त्यांना इतरही काही शारीरिक त्रास आहेत का, उदा ः डायबेटिस, अॅनिमिया, थायरॉईडशिवाय लैंगिक क्रियेतील काही अडचणी या गोष्टीही विचारणे किंवा रुग्णांनी मोकळेपणाने डॉक्टरांना सांगणे हे महत्त्वाचे आहे.

वंध्यत्व दोन प्रकारचे आहे.
१) Primary Sterility : यामध्ये मूल यापूर्वी कधीच राहिलेले नसते.
२) Secondary Sterility : यामध्ये यापूर्वी Pregnancy राहिलेली असते. (एखादे मूल असते.) परंतु त्या जोडप्याला पुढचा गर्भ राहू शकत नाही.
ज्या स्त्रियांमध्ये वरचेवर (abortion) अॅबॉर्शन होत असतील तर त्यालाही वंध्यत्व (Infertility) असे संबोधतात. वंध्यत्वाची दोघांच्यातील (स्त्री/पुरुष) कॉमन कारणे म्हणजे वय, ताणतणाव, खाणे-पिणे, जर खूपच वजन कमी असेल तर किंवा जास्त वजन असेल तरी स्मोकिंग, दारू, तंबाखू ड्रग्ज, इ.ची सवय असेल, तरीही Pregnancy राहण्यात अडचण येऊ शकते. वयाचे फार महत्त्व आहे. साधारण ३० वयानंतर पुरुषांमध्ये व ३५ वयानंतर स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे Chances जास्त आहेत.

वंध्यत्वाची पुरुषांमधील कारणे
१) (Abnormal Sprem Production) : शुक्राणूंची निर्मिती व्यवस्थित न होणे
२) (Impaired Delivery of Sperm) : शुक्राणूवहन व्यवस्थित न होणे
3) (Testosteron Deficiency) : टेस्टस्टेरॉन हार्मोनची कमतरता.
४) (Genetic Defect) : अनुवंशिक दोष
५) (Undersended testes) : टेस्टेस ग्रंथी खाली त्यांच्या जागेवर नसणे.
६) (Sexual Problem) संबंधीतील दोष अडथळे : उदा. : लिंग ताठरता नसणे किंवा कमी असणे, शीघ्र वीर्यपतन होणे, कामेच्छा कमी असणे इ. अनेक कारणे असू शकतात, तर योग्य तपासण्या होणे महत्त्वाचे असते. पुरुष (Male) तपासण्या सर्वात महत्त्वाचे शारीरिक दोष काही आहेत का, हे तपासणे म्हणजे कुठले आजार, उदा : डायबेटिस, अॅनिमिया त्या रुग्णांच्या संबंधाच्या काही सवयी आहेत का, हेही महत्त्वाचे आहे.

१) Semen Analysis
२) Harmon Testing
३) Trasrectal & Scorotal Ultrasound

स्त्री तपासण्या-
१) Blood Test
२) Checking Cervical Muscles by using Ovulation kit.
३) An Ultrasound of Overies
४) Hystroasolphingography : हे गर्भाच्या पिशवीत व काही दोष आहे का पाहण्यासाठी
५) Laproscopy : अंडाशय, गर्भवहन नळी व गर्भपिशवीचे काही दोष असतील तर
दोघांमधील वरील जे काही दोष सापडतील त्याप्रमाणे उपचार करून घ्यावे लागतात. उपचाराची दालनेही बरीच आहेत. कोणी आपल्या कुवत, माहितीनुसार व इच्छेनुसार उपचार करून घेत असतात. त्यामध्ये शस्त्रक्रिया, Ovulation Drungs, Artificial Reproductive Technology (ART), Donar eggs and embryo, surrogate mother (भाडोत्री माता) इ. ट्रीटमेंट पद्धती असू शकतात. पुरुषांमध्ये शुक्रबीजांची संख्या कमी असेल तर हार्मोनल ट्रीटमेंट व शस्त्रक्रिया होऊ शकते. वरील ट्रीटमेंट पद्धती या थोड्याफार प्रमाणात त्रासदायक व मनाला Side effects ही होतात. उदा – उल्टी, मळमळ, डोकेदुखी, वजन वाढणे, सर्वात महत्त्वाचे साईड इफेक्ट म्हणजे स्त्रीमध्ये (Twin, Triplet and Multiplets) जुळं, तिळं व एकाच वेळी अनेक गर्भ एकाच गर्भाशयात वाढायला लागतात. परंतु पुढे त्या गर्भाला व मातेलाही त्यांचे योग्य पोषण करण्यात कमी पडतात व हे दोन्हीही गर्भाला व मातेला त्रासदायकच आहे.

हे सर्व साईड इफेक्ट टाळायचे असतील तर होमिओपॅथिक चिकित्सा पद्धत की ज्यात अगदी सौम्य पद्धतींनी आजाराचे मूळचे (दोष) मुळापासून काढले जाते. होमिओपॅथिक रुग्णाचा कुठलाही एक ठराविक भाग आजारी किंवा रोगी न मानता त्या रुग्णाचा संपूर्ण अनुवंशिकता, थंड उष्ण प्रकृती) इ. आहार आवड, निवड आणि मग प्रत्येक रुग्णाचे त्याचे प्राकृतिक (Constitutional) औषध दिले जाते. त्यामुळे स्त्री व पुरुषामधील जे जे दोष आहेत ते ते कमी कमी होऊन सर्व हार्मोनल पातळीही नॉर्मलला आणली जाते, शिवाय होमिओपॅथिक औषधे रुग्णांच्यामधील लैंगिक कार्यक्षमता ही वाढवते. त्या त्या ठिकाणी जोडप्यांना मार्गदर्शन करणेही आवश्यकता असते. खाली काही होमिओपॅथिक औषधे स्त्री पुरुषांमध्ये उपयोगी पडतील, अशी देत आहे. तरी ती योग्य होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून घ्यावीत.

स्त्रीवंध्यत्वासाठी :
lodum, Conium, Bar Mur, Nat Mur, Sepia, Phos, Bromium Lyco, Causticum, Puls,

Nat C, Barox, Cale CFl. Acid, Platina

पुरुष वंध्यत्वासाठी :
Angus Cactus, lodiurn, Gelsem, Floric Acid, Nat Mur, Nit-acid, Sulphar, Lyco, Caladium, Staphysagria, stramonium, Bar-C ph-acid, conium Nux-Vomica.
१) Sepia : हे औषध स्त्री-पुरुष दोन्हीमधील वंध्यत्वावर उपयोगी आहे. रोफीया यातील स्त्री ही उंच बांधेसूद, प्रेमळ व तितकीच अलिप्तपणा दाखविणारी असते. गालावर चॉकलेटी डांग (वांग) असतो. तिचा योनीमार्ग शुष्क असून तिची कामेच्छा कमी असते. शिवाय तिला संभोगांमधील आनंद घेता येत नाही. दुखापत जाणवते. पाळीमधील तक्रार म्हणजे खूप स्रावामुळेही वंध्यत्व येते. पुरुषामध्ये लिंग ताठरता प्रॉब्लेम येतो किंवा पूर्ण ताठरता येत नाही, शीघ्र वीर्यपतनही होते. त्यामुळे वंध्यत्व येते.

२) नॅट्रम Carb- (Nat Carb) : हे औषध वंध्यत्वासाठी उपयुक्त आहे. त्याचे कारण म्हणजे त्या स्त्रियांच्या योनीचे स्नायू वीक असतात. योनी आकुंचन पटकन होते. त्यामुळे वीर्यही तेथे जास्त वेळ राहत नाही आणि योनीची कमकुवतता असल्याचे कारण म्हणजे ती स्त्री स्वतः मानसिकदृष्ट्या कमकुवत, सेन्सिटिव्ह व प्रेमळ अशी असते. तिला स्वतः कोणी दुखावलेले सहन होत नाही, ती लगेचच त्या व्यक्तीबरोबरचे संबंध तोडून टाकते किंवा त्यांना टाळते. हे रुग्ण उष्ण प्रकृतीचे असून उन्हाचा त्रास होतो. मीठ जास्त आवडते. उलटसुलट खाण्याच्याही तक्रारी असतात.

३) Lycopodium : लायकोपोडियम हे औषध स्त्री-पुरुषांमध्ये उपयुक्त आहे. हे उष्ण प्रकृतीचे रुग्ण असून त्यांना गोडाची जास्त आवड असते, लिंग ताठरणे किंवा संभोगाच्यावेळी अर्धवट लिंग ताठरणे, लिंग शिथिलता येणे व थंड पडणे, हातपायाला गोळा येणे यामुळे या रुग्णांचा आत्मविश्वास कमी कमी होऊ शकतो व त्याचा परिणाम त्याच्या कामकाजावर, बिझनेसवर होतो. चिडचिडेपणा वाढतो. स्त्रियांच्याबाबतीत खूपच कामेच्छा असणे. जास्तकरून पाळीदरम्यान ही भावना वाढते. योनीमार्गातील कोरडेपणावरही हे औषध उपयुक्त आहे. अशा प्रकारे होमिओपॅथिक औषधांनी शारीरिक / मानसिक दोष कमी होऊन ते जोडपे आपल्या संसारवेलीवर फुल उमलल्याचा आनंद घेऊ शकतात…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये