ताज्या बातम्यामनोरंजन

“परवा मुख्यमंत्री कार्यालयातून…”, प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय!

मुंबई | Prajakta Mali’s Post In Discussion – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर नेहीम सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. आता देखील प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली प्राजक्ता माळी आणि नम्रता संभेराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने तिने काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला तिने हटके कॅप्शन देखील दिलं आहे.

प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं म्हटलं आहे की, ““वर्षा” बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे…परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला…आमच्यासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, मा. श्रीकांतजी शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार…जॅकी दादांबरोबरचे क्षण म्हणजे cherry on the cake”.

दरम्यान, प्राजक्ता काही दिवसांपूर्वीच ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती ‘वाय’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत.


.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये