ताज्या बातम्या

चंद्रकांत दादांनी कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाचा खून केला

सोलापूर | ‘सोलापूर लोकसभेची निवडणूक आमच्यासाठी अवघड आहे, पण माढ्याची तर त्याहून अवघड आहे’ असे वक्तव्य करून पालकमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासाचा अक्षरशः खून केला अशी प्रक्षुभ्र भावना आता प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात व्यक्त होत आहे.

सोलापूर लोकसभेसाठी भाजपला स्वतःचा उमेदवार मिळत नव्हता . अगदी शेवटपर्यंत उमेदवारीची लढाई तिष्टच ठेवली आणि शेवटी राम सातपुते या आयात केलेल्या ऊपऱ्या उमेदवाराला येथील उमेदवारी दिली. त्यामुळे देखील भाजप कार्यकर्ते नाराज झाले परंतु ‘ मोदी का परिवार ‘ या कॅम्पेन खाली सोलापूरच्या भाजपा खासदाराची परंपरा कायम ठेवायची प्रेरणा देत कसेबसे कार्यकर्ते उठले . परंतु प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात चंद्रकांत पाटील यांनी आत्मविश्वासघातकी वक्तव्य करून कार्यकर्त्यांचा उत्साह पार मातीत घातला.

राम सातपुते या उमेदवाराबद्दल कोणालाही ममत्व नाही. देवेंद्र फडणवीस यांनीच हा उमेदवार लादल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत होते . त्यात प्रणिती सुशीलकुमार शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार तेथे भाजपा पेक्षा सरस ठरत आहेत ..यापूर्वी शरद बनसोडे आणि महास्वामी या अत्यंत निष्क्रिय खासदारांची परंपरा तेथे राहिली आहे त्यामुळे त्याचे मोठे आव्हान आहे. माढा येथे देखील देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांची वैयक्तिक समीकरणे चुकली. तेथे मोहिते – पाटील थांबले असते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत त्यांना कोणताच निरोप दिला नाही. असे मोहिते पाटील देखील आता खाजगीत सांगतात. म्हणजे नेमकं फडणवीस यांना काय साधायचं होतं ? ते आकलनाच्या पलीकडे आहे.

यातूनच तेथील कार्यकर्ता बिथरला. निंबाळकर यांची उमेदवारी देऊ नका म्हणून अनेकांनी सांगितले , परंतु भाजपाने ते ऐकले नाही . साताऱ्याचा प्रभाव क्षेत्रातील एक मोठा गट बाहेर गेला. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार आक्रमक झाले आणि मराठा समाजाची त्यांना साथ मिळत गेली . जानकर गळाले त्यामुळे धनगर मतांची देखील मोठी फाटा फूट झाली. विधानसभेतील आमदारांचे बळ असले तरी प्रत्येक विधानसभेत फूट पडली आहे . प्रशांत परिचारक फारसे प्रभावी नाही . सांगोल्यात शहाजी बापू पाटील हेच पुन्हा निवडून येतात की नाही याची शाश्वती नाही. माळशिरस पूर्ण बाजूला गेला . मान खटाव मध्ये रामराजेंची ताकद भाजपापासून फुटली. आशा मध्ये चंद्रकांत पाटील यांची , ‘ माढा फारच अवघड आहे आणि अवघड केला गेला ‘ हे वक्तव्य म्हणजे कार्यकर्त्यांच्या कशाबशा आत्मविश्वासावर विरजण पाडण्यासारखे आहे.



Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये